“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन

“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन

हिंगोली : प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो, मी एक शब्दही त्यांच्याविरोधात काढला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. आता अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सहकार्य करावे, अशी विनंती मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. ते हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेपूर्वी माध्यमांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal appealed to Prakash Ambedkar to cooperate when he was in trouble)

“आता आरक्षणावरुन वाद सुरु आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर कमंडलबरोबर होता. मग ते प्रकाश शेंडगे असो किंवा छगन भुजबळ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सभेतून केली होती, त्यावर भुजबळ यांनी हिंगोलीतील सभेपूर्वी प्रत्तुत्तर दिले.

Ahmednagar News : नगरचे शेतकरी संतापले! रस्त्यावर दूध ओतून दर कपातीचा निषेध

काय म्हणाले भुजबळ?

प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो, मी एक शब्दही त्यांच्याविरोधात काढला नाही.  मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. आता अडचणीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी सहकार्य करावे, अशी विनंती करतो. विनंती करणं चूक नाही. पण, ओबीसी आणि मराठ्यांचं ताट वेगळं असुदे, असेच मत प्रकाश आंबेडकर यांनीही मांडले आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

आता आरक्षणावरुन वाद सुरु आहे. ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. आरक्षणाचा इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. जनता दलासोबत ओबीसीचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. त्या अगोदर जनता पार्टीबरोबर. आता असणारे वाचवता येत नाही म्हणून भेडवण्याची भाषा आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

अंतरवालीत दगडफेक अन् 48 तासांत पवारांची भेट : नितेश राणेंनी उलगडला ‘मास्टर प्लॅन’

आंबेडकर पुढे म्हणाले की, दुर्दैवाने इथल्या सरकारने विकासाच्या योजना आखल्या नाहीत. म्हणून विकास करायचा असेल तर आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे असा समज झाला आहे. आरक्षण हा विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधीत्व आहे. शिवाजी महाराजांचा काळखंड सोडला तर राजे, महाराजांच्या काळात आदिवासी, दलित, ओबीसींना दरबारात चोपदार देखील होण्याचा अधिकार नव्हता. उद्याच्या लोकशाहीत हे लोक बाहेर राहू नयेत म्हणून त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आलं, असेही ते म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube