Ahmednagar News : नगरचे शेतकरी संतापले! रस्त्यावर दूध ओतून दर कपातीचा निषेध

Ahmednagar News : नगरचे शेतकरी संतापले! रस्त्यावर दूध ओतून दर कपातीचा निषेध

Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘या’ ठिकाणी होणार आणखी एक उड्डाणपूल

सरकारने म्हशीच्या दुधाला व गायचे दुधाच्या दरात कपात केल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. म्हशीच्या दुधाचा भाव 56 रुपये वरून 46 रुपये तर गाईच्या दुधाचा भाव 38 वरून 28 रुपये केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. सध्या चाऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खुराकाचे भाव, सरकी पेंड ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांडी पेड चौदाशे वरून सतराशे रुपये ,सरकी पेंड दोन हजार वरून 2650, वालीस बाराशे रुपये वरून 1750 रुपये झाली आहे. सर्व प्रकारची चारा महागाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत दूध दर कपात करून आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दुधाची नासाडी केल्यानंतरच सरकारला जाग येणार का अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. जर शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला हमीभाव मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन हे करण्यात येईल असा इशारा निमगाव वाघाचे शेतकरी भारत फलके यांनी दिला आहे.

Ahmednagar News : दिवाळीत साईंचरणी भरघोस दान; सोन्या-चांदीसह रोख स्वरूपात दररोज पावणे दोन कोटी प्राप्त

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube