Ahmednagar News : दिवाळीत साईंचरणी भरघोस दान; सोन्या-चांदीसह रोख स्वरूपात दररोज पावणे दोन कोटी प्राप्त
Ahmednagar News : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये अहमदनगरच्या (Ahmednagar News) शिर्डीच्या साईबाबा मंदिरांच (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. त्यामध्ये यावेळी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा दिवसांमध्ये 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 इतकं भरघोस दान प्राप्त झालं आहे.
सोन्या-चांदीसह रोख स्वरूपात दररोज पावणे दोन कोटी प्राप्त…
साईबाबांच्या चरणी आलेलं हे दान 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान, असेलल्या दिवाळीच्या सुट्टीत असंख्य साईभक्तांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. या दहा दिवसांच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपात तब्बल 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 इतकं भरघोस दान प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.शिवा शंकर यांनी दिली. त्यामुळे या दहा दिवसांत साईबाबांच्या चरणी दररोज पावणे दोन कोटी प्राप्त झाल्याचं दिसून आलं आहे.
मध्य प्रदेशात भाजपकडून शिवराज सिंह चौहान यांच्यासह ‘हे’ नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये
या दानामध्ये कोणकोणत्या स्वरूपातील देणग्यांचा समावेश आहे. याची सविस्तर माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ते म्हणाले की, दिनांक 10 नोव्हेंबर ते दिनांक 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत रुपये 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 प्राप्त झाली आहे. यामध्ये रोख स्वरुपात रुपये 07 कोटी 22 लाख 39 हजार 794 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर 03 कोटी 98 लाख 19 हजार 348 रुपये, पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी 02 कोटी 31 लाख 85 हजार 600, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर 03 कोटी 70 लाख 94 हजार 423, तर सोने 425.810 ग्रॅम रक्कम रुपये 22 लाख 67 हजार 189 व चांदी 8211.200 ग्रॅम रक्कम रुपये 04 लाख, 49 हजार 732 यांचा समावेश आहे.
धनगर आंदोलनाला हिंसक वळण, अदृश्य हात कुणाचा? कारवाईसाठी पडळकरांचं थेट फडणवीसांना पत्र
या अगोदर मार्च महिन्यात रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी साईबाबाचं दर्शन घेतलं होतं. या तीन दिवसाच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपातीत तब्बल 4 कोटी 9 लाख रुपयांचं दान प्राप्त झालं होतं. त्यात 1 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये दानपेटीतून, 76 लाख 18 हजार 143 रुपये देणगी काऊंटद्वारे, तर डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक, डीडी, मनी ऑर्डर यामाध्यमातून तब्बल 1 कोटी 42 लाख 52 हजार 812 रुपये प्राप्त झाले होते.