मध्य प्रदेशात भाजपकडून शिवराज सिंह चौहान यांच्यासह ‘हे’ नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये

  • Written By: Published:
मध्य प्रदेशात भाजपकडून शिवराज सिंह चौहान यांच्यासह ‘हे’ नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये

भोपाळ : मध्य प्रदेशात नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठी (Madhya Pradesh Assembly Elections) मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता सर्वांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी आपलं सरकार सत्तेत येणार असं दावे केले आहेत. आमचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होत असल्याचा दावा भाजप (BJP) करत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे सरकार आल्यास शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्याशिवाय कोण-कोण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार? याची सध्या चर्चा सुरू आहे.

धनगर आंदोलनाला हिंसक वळण, अदृश्य हात कुणाचा? कारवाईसाठी पडळकरांचं थेट फडणवीसांना पत्र 

भाजपने यावेळी मध्य प्रदेश निवडणुकीत आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपने संपूर्ण निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवला आहे. त्यांच्या नावावर आणि सरकारच्या कामावर भाजपने मते मागितली. मात्र, निकालानंतर संसदीय मंडळ मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेईल, असे भाजपचे म्हणणे आहे.

प्रल्हाद सिंग पटेल
मध्य प्रदेशात भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ते पक्षाचे तगडे नेते आहेत. ते अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. प्रल्हाद सिंह पटेल नरसिंगपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्यानंतर ते राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता परत आल्यास पक्ष त्यांच्या नावावर विचार करू शकतो.

‘जरा संयम बाळगा… ओबीसींचे आंदोलन उभं करणं योग्य नाही’; विखेंनी भुजबळ-जरांगेंना फटकारले 

फग्गन सिंह कुलस्ते

त्याचबरोबर आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप मध्यप्रदेशात आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री करू शकते. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 47 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते याच समाजातील आहेत. ते निवास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.

नरेंद्रसिंग तोमर

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मध्य प्रदेशातील निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या नावाचीही चर्चा जोरात होती. नरेंद्र सिंह तोमर दिमानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग मध्यप्रदेशात आहेत. त्यामुळं त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.

कैलाश विजयवर्गीय

त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून ते बाजूला होते. पक्षाने त्यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मी येथे आमदार होण्यासाठी आलो नाही, असा दावाही ते परिसरात करतात. मात्र, भाजप सत्तेत आल्यास विजयवर्गीय यांना संधी मिळू शकते.

व्हीडी शर्मा यांच्या नावाचीही चर्चा

यासोबतच प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा हेही डार्क हॉर्स ठरू शकतात. ते विधानसभा निवडणूक लढवत नसले तरी असे अनेक संकेत निवडणूक प्रचारादरम्यान मिळाले. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. प्रचारादरम्यान पीएम मोदी आणि व्हीडी शर्मा यांच्यात कुजबुज झाली. तसेच इंदूरमधील रोड शो दरम्यान केवळ व्हीडी शर्मा पंतप्रधानांसोबत होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube