अंतरवालीत दगडफेक अन् 48 तासांत पवारांची भेट : नितेश राणेंनी उलगडला ‘मास्टर प्लॅन’
जालना : अंतरवाली सराटी येथे झालेली दगडफेक आणि त्यानंतरचा लाठीचार्ज या घडामोडीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याच घटनेनंतर मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यभरात पोहचले. शिंदे सरकारला जनतेची माफी मागावी लागली, पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. दरम्यान, आता या घटनेमागे नेमके कोण मास्टरमाईंड होते, याबाबतचा मोठा दावा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Nitesh Rane claimed that Sharad Pawar was the mastermind behind the stone pelting at Antarwali Sarati in Jalana.)
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— Nitesh Rane (@NiteshNRane) November 26, 2023
नितेश राणे यांनी एक्सवर एक फोटो ट्विट करुन हा दावा केला आहे, ते म्हणाले, दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बेदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा सवालही त्यांनी विचारला.
Lok Sabha Election : ‘शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा देणार?’ फडणवीसांनी ठरलेलं सांगितलं
ऋषीकेश बदरेला अटक :
दरम्यान, या दगडफेकीच्या घटनेत काल (25 नोव्हेंबर) ऋषिकेश बेदरे याला अंबड पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. एक गावठी पिस्तू आणि दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. बेदरे हा मुख्य आरोपी असून आणखी तिघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाती आणखीही कुणी सहभागी आहेत का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात आरोपींवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Uttarakhand Rescue : मजुरांची सुटका कधी होणार? तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट
लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले नव्हते :
दरम्यान, जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, असे या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरटीआयमधून समोर आले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्रालयही देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज होऊ शकत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता. फडणवीसांवर होत असलेल्या आरोपांवर आता उत्तर सापडले आहे. आरटीआय कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे आरटीआय अंतर्गत याबाबत माहिती मागवली होती.