Nitesh Rane : मराठा समाजाचा खरा ‘व्हिलन’ उद्धव ठाकरे; आरक्षणावरून नितेश राणेंचा घणाघात
Nitesh Rane : मराठा आरक्षणावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये त्यावरून चांगलीच जुंपली आहे. त्यात राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे असा माणुस आहे. जो आयुष्यामध्ये एक बाप म्हणून फैल्युर झाला. एक मुलगा म्हणून फैल्युर झाला. पक्षप्रमुख म्हणून फैल्युर झाला आणि मुख्यमंत्री फेल्युर झाला. त्याच उद्धव ठाकरेंचा कामगार आज आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फैल्युर म्हणण्याचं धाडस करतोय. पण मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? त्यासाठी आमच्या सरकारची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाचा खरा विलन उद्धव ठाकरे आहेत. अशी टीका राणे यांनी केली आहे.
नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर
जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. आजच्या जाहिरातीत मराठा आरक्षणासाठी धोरण आखले असल्याचे सांगण्यात आले आहे. “धोरण आखले आहे..तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे असा मजकूर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत जरागेंसह मराठा समाजाला मोठं गिफ्ट देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीवरू जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आजच्या वर्तमान पत्रांमध्ये विस्तृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातील मजकूरावरून सरकार बॅकफुटवर आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकार मराठा समाजाला मोठं गिफ्ट देणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.