Download App

पुन्हा नोटबंदी! “पाचशेच्या नोटा शंभर अन् दोनशेत बदलून घ्या”; बड्या नेत्याचं सूचक विधान

Prakash Ambedkar Statement On Demonetisation: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते, यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपा व आरएसएसवर सडकून टीका केली आहे. आर.एस.एस व भाजप हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. तसेच भाजप हे कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखावा, असा सल्ला देखील आपल्या भाषणात बोलताना केला.

भाजपा व आरएसएस हे जाती-जातीमध्ये भांडण लावून आरक्षणाच्या मुद्द्यावरू मराठा व ओबीसींमध्ये तर आदिवासींचा कोळ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात आदिवासी एल्गार परिषदेत केला आहे.

युद्धामध्ये ज्याप्रमाणे सैन्य आपापल्या बॉर्डरवर उभ राहते,त्याच प्रमाणेच जाती जातीच्या नावावर सीमांवर हे सरकार भांडण लावत असल्याचे असल्याचे म्हंटले. अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी व आरएसएस वर निशाना साधला, तर ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन मध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी आहे.

‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा

त्याचबरोबर 2024 च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोट बंदी होईल त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात असं म्हणत, पुन्हा एकदा नोटबंदी होण्याची दाट शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

follow us