Download App

शिंदे गटाची बोळवण? प्रतापराव जाधवांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली

Prataprao Jadhav Oath Ceremony : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली. जाधव यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू होती मात्र, त्यांची राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली.

NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला. सुरवातीला नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली. जाधव यांनी हिंदीतून शपथ घेतली.

जेपी नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश, कॅनिबेट मंत्रिपदाची घेतली शपथ 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने सात जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाला पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आलं. मंत्रिमंडळात शिंदे गटातील कोणाला संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा होती. बारणे हे यंदा सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. तर जाधव चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बारणेंऐवजी खासदार जाधव यांच्या नावाला पसंदी दिली. जाधव यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं.

कोण आहेत प्रतापराव जाधव?
प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सरपंच पदापासून सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत आमदारकी आणि खासदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. प्रतापराव जाधव यांनी 2009, 2014, 2019 आणि 2024 या सलग चार लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

मंत्रिपद मिळेल असं स्वप्नातही वाटलं नाही…
दरम्यान, प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. जाधव यांचे काका यांनी आम्ही स्वप्नातही मंत्रीपद मिळेल याचा विचार केला नव्हता. प्रतापरांवांना मंत्रिपद मिळाल्याने आम्हा सगळ्यांना आनंद झाला. विठ्ठलाच्या कृपेने, मतदारांच्या आणि मोदीजींच्या आशिर्वादाने ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, आम्ही मोदींचे आणि विठ्ठलाचे कृतज्ञ राहू, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags

follow us

वेब स्टोरीज