Download App

शरद पवारांची बावनकुळेंवर टीका; प्रविण दरेकरांचा खोचक टोला, म्हणाले..,

pravin Darekar On Sharad pawar : शरद पवार यांनी भाजप नेत्यांची उठाठेव करु नये, स्वत:च्या पक्षाचा ऱ्हास का होत आहे, याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावरुन दरेकरांनी पवारांचा समाचार घेतला आहे.

शिंदे सरकारकडे उरले अखेरचे काही तास; जरांगे पाटील यांच्यासमोर पाच पर्याय कोणते?

दरेकर म्हणाले, पवार यांनी भाजप आणि बावनकुळे यांची चिंता करू नये. अजितदादांसारख्या नेत्याबरोबर आपला ९० टक्के पक्ष का निघून गेला, याचा विचार त्यांनी करावा. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यासारखे ज्येष्ठ व एकनिष्ठ साथीदार आपल्याला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. पवार यांनी भाजपची आणि भाजप नेत्यांची नसती उठाठेव करू नये, तर स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला, याचे आत्मपरीक्षण करून त्यांची चिंता करावी, असं ते म्हणाले आहेत.

मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…

काय म्हणाले होते शरद पवार?
चंद्रशेखर बावनकुळेंची समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं, असं शरद पवार म्हणाले होते.

Telangana Election : भाजपही तयारच! KCR विरोधात BRS चा माजी नेताच मैदानात

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नसली, तरी त्यांना राज्य प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरून पक्षविस्तार करीत आहेत. त्यांनी राज्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पवार यांनी भाजपची आणि बावनकुळे यांची चिंता करू नये,
असंही ते म्हणाले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी केली जात आहे. अशातच आता कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन दोन्ही पक्षात रणकंदन सुरु असल्याचं दिसून येत आहे. हा जीआर मागे घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून घोषणेदरम्यान फडणवीसांनी विरोधकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Tags

follow us