मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…

मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…

केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांची रथ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश सरकारकडून काढण्यात आला आहे. या आदेशाविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका

मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्यांचा काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला. लष्करात कार्यरत असलेले सैनिक आणि देशाच्या नोकरशाहीला राजकीय प्रचारक बनवू नका, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

खर्गे म्हटले, मोदी सरकार नेहमीच केवळ प्रसिद्धीत गुंतलेले असते. देशात त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होत असताना आता त्यांच्या सरकारच्या बढतीसाठी अधिकारी ‘रथ प्रभारी’ होतील, असा आदेश त्यांनी काढला आहे. आता ते सरकारी काम सोडून सरकारची रथयात्रा काढणार आहेत.

Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट

याआधी सैनिकांनाही रजेवर घरी जाताना सरकारी योजनांचा प्रचार करण्याचे आदेश दिले. आपले शूर सैनिक जेव्हा घरी जातात तेव्हा ते आपल्या कुटुंबियांसोबत राहतात, विश्रांती घेतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात. सरकारी अधिकाऱ्यांचे काम रथयात्रा काढणे नाही, शिपायाचे काम सरकारचा प्रचार करणे नसल्याचं खर्गेंनी म्हटलं आहे.

ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक

प्रचारात सरकारी अधिकारी आणि सैनिकांना कामाला लावणे योग्य नाही. कोणत्याही कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांचा वापर होत असल्याचे पहिल्यांदाच पाहिल्याचा दावा खरगे यांनी केला. तसेच या गोष्टी करून भाजप देशाला कमकुवत करत आहे आणि लोकशाही व्यवस्था नष्ट करत आहे, असा दावा काँग्रेस नेत्याने केला. त्यामुळेच आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून हे आदेश तातडीने मागे घेण्याची विनंती खर्गे यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारचा हा आदेश नोकरशहांच्या सेवा नियमांचे उल्लंघन करणारा आहे. सरकारी नोकर कोणत्याही प्रकारचे राजकीय काम करू शकत नाहीत,’’ असे सेवा नियमांद्वारे स्पष्ट करण्यात आले असल्याचे खर्गे यांनी सांगितले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube