Download App

नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण, कोणी कितीही आघाड्या केल्या तरी….; PM मोदींचा विरोधकांना टोला

  • Written By: Last Updated:

NDA meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित बैठक नुकतीच बेंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत युतीचे नाव इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स) ठेवण्यात आलं. या बैठकित बोलतांना विरोधकांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. तर विरोधकांच्या याच नव्या युतीवरून पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस (Congress) आणि विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. जातीवर आधारीत आघाड्या देशाला नुकसान पोहोचवतात. प्रांतवादाची भूमिका देशाला मारक असून कॉंग्रेसने ९० च्या दशकात अस्थिरता आणण्यासाठी आघाड्याचं राजकारण करायला सुरूवात केल्याची टीका त्यांनी केली. (Prime Minister Narendra Modi on opposition party in NDA meeting)

आज एनडीएची संयुक्त बैठक दिल्लीत झाली. त्या बैठकित उपस्थित मित्र पक्षांच्या नेत्यांना संबोधित करतांना मोदी म्हणाले,
विरोधकांनी एनडीएच्या विरोधात कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा विश्वास एनडीएवर आहे. हे गेल्या दहावर्षापासून दिसून येते. कोणी कितीही आघाड्या केल्या तरी दुरदृष्टी असलेल्या आघाड्याच देशाला दिशा देऊ शकतात. जातीवर आधारीत आघाड्या देशाला नुकसान पोहोचवतात. प्रांतवादाची भूमिका देशाला मारक असल्याचं मोदी म्हणाले.

ते म्हणाले, एनडीएनं लोकशाही मजबूत केल्यानं भारतीचा जगभर गौरवा होतोय. देशात स्थिर आणि मजबूत सरकार देण्याचा एनडीचा प्रयत्न आहे. देशातील सरकारे बहुमतांनी बनत असतील मात्र, देश सगळ्यांच्या प्रयत्नांनी चालतो, असंही मोदी म्हणाले.

राहुल व सोनिया गांधींचे विमान तातडीने भोपाळला उतरविले 

मोदी म्हणाले, एनडीएचा अजेंडा, संकल्प, भावना सकारात्मक आहे. भाजने कायम सकारात्मक राजकारण केलं. ज्या आघाड्या नकारात्मक होत्या, त्या सफल झाल्या नाहीत. कॉंग्रेसने ९० च्या दशकात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न कऱण्यासाठी आघाड्या केल्या. त्यानंतर एनडीची स्थापना झाली. सरकार बनववणं किंवा सत्ता मिळवणं हे एनडीएचं उद्दीष्ट कधीच नव्हतं आणि नसणार आहे. एनडीए कुणाच्या विरोधात नाही, किंवा कुणाला सत्तेतून हटवण्यासाठी एनडीएची स्थापना झाली नाही. एनडीएची स्थापना देशात स्थिरता आणण्यासाठी निर्माण झाल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये शिवसेना-भाजपला बहुमत असतांना मविआची स्थापना झाली. तर काही दिवसांपूर्वी ट्विटरने दिल्ली शेतकरी आंदोलनात पत्रकार, विरोधकांच्या पोस्ट हटवण्यासाठी मोदी सरकारने दबाव आणल्याचा खुलास केला. यावरूनही मोदींनी विरोधकांवर टीका केला होती. जेव्हा आम्ही विरोधात होतो, तेव्हा भाजपने सकारात्मक राजकारण केलं. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी अथक प्रयत्न केले. घोटाळे उघड केले, पण जनादेशाचा अपमान केला नाही. सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत घेतली नाही. आम्ही देशाच्या विकसात कधी अडथळा बनलो नाही, असं मोदी म्हणाले.

ते म्हणाले, केंद्राच्या योजनांना अनेक राज्यात लागू केल्या जात नाही. लागू झाल्याच तर बंद पाडल्या जातात. विरोधकांना वाटतं की, केंद्राच्या योजना सुरू झाल्या तर विरोधकांना राजकारण करण्यासाठी मुद्दा मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी म्हणाले, एनडीएतील घटक पक्ष वंचित समुदायातिल आहेत. एनडीएत असे लोक आहेत, ज्यांच्या आवाज कधी दिल्लीत पोहोचला नाही. एनडीए देशासाठी, देशातील जनेला समर्पित आहे. एनडीएने जेव्हा मागच्या सरकारचे लाखो करोडेंचे घोटाळे उघड केले. तेव्हा मागचं सरकार आपल्या मित्र पक्षांना दोष द्यायचं. मात्र, आमच्यासाठी गठबंधन मजुबरी नाहीतर मजबुती आहे. क्रेडिट आणि दायित्व सारखंच आहे. कुठलाही मित्र पक्ष लहान नाही किंवा मोठं नाही. २०१४ पासून एनडीएचीची वज्रमुठ अबाधित आहे. नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण आहे, असल्याचं मोदी म्हणाले.

 

 

Tags

follow us