Nitin Gadkari : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे बातम्या समोर येत होते मात्र आता याबाबत नितीन गडकरी यांनी भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. ते आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माझे आणि पंतप्रधान मोदींचे नाते खूप चांगले आहे असं म्हटले आहे.
या कार्यक्रमात तुम्हाला पंतप्रधान होण्याची ऑफर (PM Offer) विरोधकांकडून देण्यात आली होती त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देत नितीन गडकरी म्हणाले की, मी त्यांची ऑफर नाकारली आहे. जेव्हा मला त्यांनी ऑफर दिली होती तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्हाला मला पंतप्रधान का करायचे आहे आणि मी पंतप्रधान (मोदी) सोबत का राहू नये? असं म्हणत मी त्यांची ऑफर नाकारली.
त्यांनी मला लोकसभेपूर्वी आणि नंतरही ऑफर दिली होती असा खुलासा देखील यावेळी त्यांनी केला तसेच मला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा नाही असं देखील या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले. मात्र विरोधी पक्षातील कोणत्या नेत्याने तुम्हाला ऑफर दिली होती याबाबत खुलासा करण्यास त्यांनी नाकार दिला.
तसेच पंतप्रधान मोदींचे वाढते वय आणि आरएसएसमधील त्यांची विश्वासार्हता पाहून पंतप्रधान मोदींनंतर प्रमोशन मिळेल का? असं देखील प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत नितीन गडकरी म्हणाले की, मी आरएसएसचा स्वयंसेवक आहे. तुम्ही याबाबत पंतप्रधान मोदींना विचारू शकतात , पण माझे आणि पंतप्रधान मोदींचे नाते खूप चांगले आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
राज्यात नवीन 75 थिएटर्स सरकारतर्फे उभारली जाणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
तसेच मी राजकारणात काही बनवण्यासाठी आलो नाही. राजकारण हे आर्थिक साधन आहे, असे मला नेहमीच वाटते. कोणीही कोणाला पुढे जाऊ देत नाही, पण मला अशी कोणतीही अडचण नाही आणि मी सध्या जिथे आहे तिथे आनंदी आहे. त्यामुळे माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही आणि जर मी त्याच्या लायक असेल तर ते मला मिळेल असं देखील या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले.