मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या (Rain) इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. तसेच त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या मौदानावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi’s visit to Pune Cancelled Due To Heavy Rain Situation In the City)
PM Narendra Modi's visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city.
(File photo) pic.twitter.com/VJlrBepmzM
— ANI (@ANI) September 26, 2024
कसा होता PM मोदींचा पुणे दौरा?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगटे असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती.
Encounter: असे एन्काऊंटर झाले पाहिजेत; राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंकडून पोलिसांचं अभिनंदन
मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. तसेच मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics: ‘मी शरद पवारांच्या डोळ्यात डोळे घालून…’; अजितदादांच्या विधानाची चर्चा
पावसाचे धुमशान! पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी