Prithviraj Chavan on Amit Shah : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेटगनच्या वापरावरून विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना संसदेत उत्तर देण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अमित शहांवर जोरदार टीका केली. “अमित शहा अधिवेशनाच्या काळात संसदेत आलेच नाहीत. यातून ते सभागृहाला सामोरं जायला घाबरतात हेच सिद्ध होत आहे आणि उलट तुम्ही आम्हालाच पळपुटे म्हणतात,” असे चव्हाण म्हणाले.
आम आदमी पक्षाची बी टीम की, पक्ष स्थापन करणार? दिपके म्हणाले, लोकांच्या मनात…
….हे सर्व गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन झाले
आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, पॅलेटगन वापरण्यात आल्या आणि त्यात एका विद्यार्थ्याचा डोळा गेल्याचा दावा चव्हाण यांनी केला. तसेच बिहारमधील घटनेचा उल्लेख करत “बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके 47 वापरली,” असे ते म्हणाले. “हे सर्व गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन झाले असेल आणि तसे आदेश जर अमित शहांनी दिले नसतील तर त्यांनी सभागृहात येऊन तसं सांगावं,” अशी मागणीही त्यांनी केली.
ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला? विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय
अमित शहा नालायक गृहमंत्री
अमित शहा यांनी या प्रकरणावर संसदेत उत्तर द्यावे, अशी मागणी करत चव्हाण यांनी पुढे थेट टीका केली. “आमची एकच मागणी आहे की, अमित शहांनी याबाबत उत्तरं द्यावीत. त्यानंतर जर आमचं समाधान झालं तर आम्ही बोलणार नाही. पण अमित शहा उत्तरंच देऊ शकत नाहीत. उलट अमित शहांना याबाबत माहिती नसेल तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “नेहमी विरोधकांच्या माथी खापर फोडू नका,” असेही त्यांनी यावेळी सुनावले.
