कॉकरोच जनता पक्ष आक्रमक, निवडणूक आयुक्त ज्ञानेश नवं टार्गेट, आंदोलनाची घोषणा करणार?

CJP : SIRच्या मुद्द्यावरून अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 23T213811.889

Gyanesh Kumar SIR Controversy :  कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके (CJP) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालात SIR प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत 24 सप्टेंबर रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या तपासणी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा औपचारिक आक्षेप नोंदवले. नव्या मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील नावांची भर आणि वगळणे, फॉर्म 6 मधील बदल तसेच मतदार यादीच्या डिजिटल व्यवस्थेच्या केंद्रीकरणासंदर्भात या आक्षेपांचा समावेश असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

SIR वर दोन आयुक्तांचे 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप? विरोधकांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल नेमकं प्रकरण काय?

या अहवालानंतर विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे SIR प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील नावांबाबत त्यांनी आरोप करत, निवडणुका घेण्याऐवजी त्यांची पटकथा लिहिली जात असल्याचा दावा केला आहे. हे दावे दीपके यांनी केले असून, त्याला निवडणूक आयोगाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली असल्याचं उपलब्ध वृत्तांमध्ये नमूद नाही.

दरम्यान, दीपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भूमिका मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या आधीही विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे SIR प्रक्रियेतील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

follow us