Download App

Prithviraj Chavan : काँग्रेससोबतच्या ‘त्या’ वादावादीने शरद पवारांची पहाटेच्या शपथविधीला सहमती

Prithviraj Chavan on Sharad Pawar retirement : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

पवारसाहेब गेली 64 वर्ष झाले सक्रिय राजकारणात आहेत. वयाच्या 82 व्या वर्षी आता आपण पद घ्यावं किंवा राष्ट्रीय पातळीवर एखादं पद घ्यावं असा त्यांच्या मनात वेगळा विचार येऊ शकतो. पण अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना विश्रांतीची गरज आहे. पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांची भूमिका आहे? किंवा पक्षातला अंतर्गत वाद आहे? त्यातून नाराज होऊन त्यांनी काही निर्णय घेतला का? हा त्यांचा अंतर्गत वाद आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की 2019 साली भाजप सरकार येण्यापासून थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन आघाडी स्थापन केली पाहिजे. मोठा पक्ष असेल त्याकडे नेतृत्व द्यायचं यावर आमच्यात एकमत झाले होते. त्यातून महाविकास आघाडीची स्थापना झाली. पण शरद पवार यांनी लोक माझे सांगती या पुस्तकात सरकार स्थापन करताना काँग्रेसची आडमूठी भूमिका होती असे लिहिले असल्याचे माध्यमातून समजले. पण आघाडी स्थापन होताना त्यातील दोन पक्ष प्रादेशिक होते. त्यांची निर्णय प्रक्रिया मुंबईपर्यंत मर्यादित असते. पण राष्ट्रीय पक्षाला सर्वच राज्यातील नेतृत्वाचा विचार करावा लागतो.

महाराष्ट्रात आपण असा निर्णय घेतला तर इतर राज्यात काय परिणाम होईल? याचा विचार करावा लागतो. त्याला वेळ लागू शकतो. राज्यातील अल्पसंख्यांक नेत्यांना काय वाटतं? हे देखील पाहिलं जातं. आम्ही राज्यातील नेत्यांनी आग्रही भूमिका राष्ट्रीय नेत्यांपुढं मांडली होती. पण यांचा आग्रह मंत्री होण्यासाठी आहे का? काही व्यापक विचार आहे की स्वार्थ आहे? असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावर चर्चा झाली. सोनिया गांधींनी इतर राज्यातील नेत्यांना याबाबत विचारले. अल्पसंख्यांक नेत्यांना विचारले गेले. त्यांच्याकडून जेव्हा होकार आला त्यानंतर आमच्या पक्षाने ह्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबात प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान; म्हणाले, मी अध्यक्ष पदासाठी…

अजित पवार आणि फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी होण्यापूर्वी शरद पवार यांच्या घरी झालेली बैठक थोडी वादळी झाली होती. काही मुद्द्यांवर काँग्रेस नेते आणि पवारसाहेब यांच्यात मतभेद झाले होते. त्यापूर्वी दिल्लीत शरद पवारांच्या घरी एक बैठक झाली होती. त्यामध्ये काही लोकांना वटाले की एकमत झाले आणि पवारसाहेबांनी वेगळा अर्थ काढला. त्यामुद्द्यावरुन पवारसाहेब नाराज झाले होते. यामुळे सकाळचा शपथविधी झाला का? हे जर असेल तर आम्हाला धक्कादायक बसला. म्हणजे मग हे ठरवून झाले का? पवारसाहेबांच्या आर्शिवादाने अजित पवार गेले का? फडणवीसांनी देखील एका मुलाखतीत मोठा दावा केला होता. त्यांचा आणि ह्यांच्या पुस्तकाचा संदर्भ लावला तर मग खरं म्हणवं लागलं, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितेल.

Tags

follow us