सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर

सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर

Prafulla Patel on NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही सुप्रिया सुळेच अध्यक्ष होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी भाष्य केले आहे. पटेल म्हणाले,आपल्याला अध्यक्षपदामध्ये कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. मला अध्यक्ष होण्यात आजिबात रस नाही. माझ्याकडे आधीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मी आधीच पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्षही आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

ते पुढे म्हणाले, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची कालपासून चर्चा आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच छगन भुजबळांचे वैयक्तिक मत आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार हे सर्व माध्यमात सुरु असलेले अंदाज आहेत.

आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक नव्हती. बैठकीसाठी कोणतेही नेते आले नव्हते. शरद पवारसाहेब नेहमीप्रमाणे आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आले होते. कोणताही निर्णय झाला नाही. पवारसाहेबांनी दोन-तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. अजून एक-दोन दिवस वाट पाहू. त्यानंतर बैठकीबद्दल मी अधिकृत स्वतः सांगणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

सुप्रिया सुळे पक्षाच्या अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, हे सर्व तर्क आहेत. सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे. कुणी काही बोलले की त्यावर ब्रेकिंग न्यूज चालवली. हे चुकीचे आहे. पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पटेल म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube