Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

Ramdas Kadam On Ajit Pawar : बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मिर नाहीय. माझ्या महाराष्ट्रातल्या रात्नागिरीतला भाग आहे आणि मी जाणार. 6 तारखेला प्रथम मी बारसूला जाणार आहे. बारसूत माझ्या नावाने पत्र दाखवत आहेत. उद्धव ठाकरेंनी ही जागा सुचवली. हो दाखवली पण त्या पत्रात असं लिहिलं का पोलीस घुसवा, वेळप्रसंगी गोळ्या चालवा आणि रिफायनरी करुन दाखवा असं लिहिलं आहे का? माझं पत्र तिकडं नाचवत असाल तर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हे काय म्हणत होते की राष्ट्रवादी दादागिरी करत आहे. पवार साहेबांच्या आमलाखाली गेले आहेत. पण उदय सामंत पवारसाहेबांना भेटून आलेत. म्हणजे तुम्ही गेलात तर चालतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे यांना केला आहे.

त्यादरम्यानच मंगळवारी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा काल प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे ‘लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती मंगळवारी प्रकाशित झाली. या दुसऱ्या आवृत्तीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी केलेला उल्लेख चर्चेत आहे.

Sharad Pawar Retirement : साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात..; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी

यासर्व घटनांवर बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कदम म्हणाले की, अजित पवारांमुळेच शिवसेना फुटली असा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे या गुळाच्या गणपतीला मुख्यमंत्री केलं. स्वतः सरकार चालवलं. आपल्या पक्षाला जास्त निधी मिळवला. शिवसेनेशी अजितदादांनी बेइमानी केली. त्यामुळे 40 आमदारांना बाहेर पडावं लागलं.

माझ्या मुलाला निधी न देता अजित दादांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला निधी दिला. माझ्याकडे त्यासंदर्भात सर्व कागदपत्र आहेत. त्यांची रणनिती होती की, अशा प्रकारे शिवसेनेच्या आमदारांना संपवायचं आणि आपले 100 आमदार निवडून आणायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं. अजित दादांच्या या राक्षसी स्वप्नापायी शिवसेनेत फुट पडली. तर ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बारसूसाठी पत्र दिले. तेच आता बारसूला जात आहेत. अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube