Chagan Bhujbal Property : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्षांकडून उमेदवारी घोषित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीयं. भुजबळ यांना आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आलीयं. आयोगाच्या माहितीनूसार छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी 32 लाख 66 हजार 235 रुपयांची जंगम मालमत्ता असून 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
इच्छुक म्हणून येणार अन् गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी, स्क्रिनशॉट व्हायरल
छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या नावावर 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रुपये जंगम आणि 16 कोटी 53 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर छगन भुजबळांकडे 585 ग्रॅम आणि पत्नीकडे 455 ग्रॅम सोने आहे.
“मनापासून प्रयत्न केल्याने मला…,” ‘गुम है किसीके प्यार में’फेम रजतने मराठी शिकण्याचा अनुभव केला शेअर
तसेच भुजबळ यांच्या नावावर ट्रॅक्टर तर पत्नीच्या नावावर पिकअप वाहन आहे. विविध ठिकाणीही मालमत्ता असून त्यामध्ये रहिवास आणि शेतजमीनींचा समावेश आहे. छगन भुजबळांच्या नावावर 24 लाख 56 हजार तर पत्नीच्या नावावर 21 लाख 10 हजार 250 कर्ज आहे.
रोकड किती?
छगन भुजबळ – 1 लाख 3 हजार 160 रुपये
पत्नी मीना भुजबळ – 51 हजार 700 रुपये
बॅंकेतील ठेवी?
छगन भुजबळ –
12 लाख 66 हजार 56 रुपये
2 लाख 9 हजार 378 रुपये
2 लाख 9 हजार 381 रुपये
2 लाख 9 हजार 380 रुपये
46 लाख 20 हजार 787
मीना भुजबळ-
5 लाख 89 हजार 470 रुपये
1 लाख 64 हजार 170 रुपये
शेअर्स, बॉन्ड
छगन भुजबळ –
1 लाख 65 हजार 52 रुपये
मीना भुजबळ-
25 लाख 25 हजार 100 रुपये
सोने –
21 लाख 6 हजार रुपये
इतर ठेवींसह जंगम मालमत्ता
छगन भुजबळ –
1 कोटी 1 लाख 25 हजार 794
मीना भुजबळ –
1 कोटी 65 लाख 20 हजार 191 रुपये
स्थावर मालमत्ता
छगन भुजबळ – 10 कोटी 38 लाख 94 हजार 639 रुपये
मीना भुजबळ –
13 कोटी 88 लाख 98 हजार 674 रुपये)