Download App

मोठी बातमी : Kasba काँग्रेसकडे तर Chinchwad राष्ट्रवादीकडे, भाजपची डोकेदुखी वाढली

पुणे : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आता थंड झाली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Agadi) दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लेट्सअपला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जागा वाटपही झाले आहे. यानुसार कसब्याची जागा काँग्रेसकडे (Congress) आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे (Ncp) देण्याचे निश्चित झाले आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी,४ फेब्रुवारी ) रोजी होणार आहे. या संभाव्य निर्णयावर शिवसेनेतील स्थानिक नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता असणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितरीत्या ही निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज व्यक्त केल्याने भाजपसमोर डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाकडून सुभाष देसाई आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्याची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड येथील पोटनिवडणूक होणार आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता राहणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपने केले होते. मात्र महाविकास आघाडीने ते फेटाळून लावले.

या आधी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. महाविकास आघाडीतील आमदारांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तेव्हा तेव्हा भाजपने या निवडणुका लढवल्या होत्या, याची आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपला करून दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने महाविकास आघाडीमध्ये सध्या खुशीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीवर होणार आहे.कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २६ नामनिर्देशन पत्र नेले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=vXCy2iIFWas

Tags

follow us