पुणे : कसबा विधानसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे आघाडीकर आहेत. धंगेकरांनी आत्तापर्यंत 56497 मते घेतली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने 50490 यांनी मते घेतली आहेत. मतमोजणीच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत. भाजपला त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ याठिकाणी अपेक्षित मतदान झालेले नाही.
रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला आहे. कसब्यामध्ये पंधराव्या फेरीत धंगेकर 6007 मतांनी आघाडीवर आहेत. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेली 25 वर्षे याठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. यावेळी मात्र याठिकाणी बदल होणार असे काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष सुरु आहे. मतमोजणीच्या फक्त पाच फेऱ्या बाकी आहेत. कोण आला रे, कोण आला कसब्याचा वाघ आला, अशा घोषणा धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. मतमोजणीमध्ये धंगेकर यांनी पहिल्यापासून आपली आघाडी कायम ठेवली आहे. गेली 28 वर्षे कसबा मतदारसंघ हा भाजपकडे होता.
Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…
दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अनेकांची नावे चर्चेत आली होती. अखेर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट घडला होता. या मतदारसंघासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.
Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर
तसेच चिंचवडमध्ये नवव्या फेरीअखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताधिक्यात निर्णायक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. अश्विनी जगताप यांना 32 हजार 288 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 25 हजार 922 आणी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 10 हजार705 मते मिळाली आहेत.