Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…

Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…

पुणे : चिंचवडमध्ये नवव्या फेरीअखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताधिक्यात निर्णायक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. अश्विनी जगताप यांना 32 हजार 288 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 25 हजार 922 आणी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १० हजार ७०५ मते मिळाली आहेत.

आठव्या फेरीअखेरीस भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मोठ्या मताधिक्क्याने आघाडी घेतली असून त्यांना 28 हजार 710 मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर असून काटे यांना 23 हजार 717 मते मिळाली होती.

चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाचं आत्तापर्यंत चित्र पाहुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या आठव्या फेरीमध्ये नाना काटे यांना भाजपच्या अश्विनी जगतापांनी मागे टाकल्याने राजकीय नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राऊतांविरोधात BJP आक्रमक, हक्कभंग समितीही गठीत; पण राऊतांवर कारवाई करता येणार नाही!

तिसऱ्या फेरीपासून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. सहाव्या फेरीत अश्विनी जगताप यांना २० हजार ५२९ मते, नाना काटे यांना १७ हजार २१० मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ७ हजार १४१ मते मिळाली होती. तसेच पाचव्या फेरीत जगताप यांना १६ हजार ५२२ मते, नाना काटे यांना १३ हजार ५७५ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ५ हजार मते मिळाली होती.

Maharashtra Politics : ‘भाजपला गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना…; संजय राऊतांची घणाघाती टीका

चिंचवडच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात आलं होतं. महाविकास आघाडीकडून नाना काटेंचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला, काटे यांना कलाटेंमुळे निवडणुकीत मताधिक्यांमध्ये मोठा धक्का बसला असल्याने त्यांचा पराभव होण्याची शक्यता आत्तापर्यंत आलेल्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.

आज निवडणुका झाल्या तर…संजय राऊतांचा मोठा दावा

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या दोन्ही जागांसाठी राज्यातून दिग्गज नेत्यांची प्रचार हजेरी होती. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसकडून नाना पटोले तर शिवसेनेच्या नेत्यांनी चिंचवड आणि कसब्याच्या जागेसाठी कंबर कसल्याचं दिसून आलं होतं.

तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन,खासदार बापट, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राम शिंदे, यांच्यासह संपूर्ण राज्यातील यंत्रणा या दोन जागांसाठी कामाला लागली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube