Maharashtra Politics : ‘भाजपला गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना…; संजय राऊतांची घणाघाती टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T174710.592

कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Sanjay Raut) आव्हान वाटत आहेत, म्हणून यांनी शिवसेना (shivsena) फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसंच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी वाटली नाही ? इतके बेईमान कसे झाला ? असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले या वाघाशी लढणं भाजपला (BJP) गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना जमणार नाही, यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शिवगर्जना मेळाव्यात भाजप, शिंदे गटावर सडकून टीकास्त्र सोडले. हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा, अशा शब्दात राऊतांनी हक्कभंगावरुन हल्लाबोल केला. कोल्हापूर छत्रपती शाहूंची भूमी आहे, कडवट इमानदारांची भूमी आहे. कोल्हापुरातील संदेश राज्यात जातो. पुन्हा एकदा शिवसेनेचं नंदनवन होईल, पानगळ झाल्याशिवाय वसंत बहरत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Sanjay Raut : तुरुंगात गेलो, यांना काय घाबरायचं ?; हक्कभंगाच्या गदारोळावर राऊतांनी सुनावले

राऊत म्हणाले, की माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात आहे. देशातील सभागृहाचा आदर आहे. ते पुढे म्हणाले, की चोरांवर संस्कार नसतात, काय अपेक्षा करायची ? कुणाची धिंड निघते पाहू. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. न घाबरता तुरुंगवास पत्करला, यांना काय घाबरायचं. राज्यातील अनेक प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी संजय राऊतला टार्गेट केले जात आहे. मी खासदार असल्याने राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. शिवसेनेचा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे.

Tags

follow us