आज निवडणुका झाल्या तर…संजय राऊतांचा मोठा दावा

  • Written By: Published:
Sanjay Raut

कोल्हापूर : आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये मोठा दावा केला आहे, जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले राज्यात आज जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी शिवसेना 150 जागा जिंकेल असा दावा संजय राऊत यांनी केला. आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. 2024 साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार, असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला.

आज पंतप्रधान मोदींनाही उद्धव ठाकरे हे आव्हान वाटताहेत. त्यामुळेच शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. पण सच्चा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा आहे आणि हिच खरी आमची ताकद आहे”, संजय राऊत पुढे म्हणाले “मोदींचे मित्र म्हणून अदानींना नोटीस मिळत नाही. पण आमच्या आमदारांना आणि मला नोटीस मिळते, हे या देशाचं दुर्दैव आहे.

आर. अश्विन बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज 

गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही आणि याची प्रचिती २०२४ मध्ये येईल. गद्दारांनी पाठित खंजीर खूपसला आणि शिवसेना फोडली. गद्दारांना खोके मिळाले असतील पण शिवसेनेनं त्यांना प्रतिष्ठा दिली होती हे ते आज विसरले आहेत. असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us