मुळीकांना अजितदादांनी सुनावलं; पण आता राष्ट्रवादीकडूनच ‘भावी खासदाराची’ बॅनरबाजी

NCP Leader On Pune Loksabha :  पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T131200.354

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 10T131200.354

NCP Leader On Pune Loksabha :  पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना जाऊन काहीच दिवस झाले असताना हे बॅनर लागले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचे पुण्यनगरीचे भावी खासदार म्हणून होर्डिंग लागले आहे.

यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. याचे कारण अद्याप गिरीश बापट यांचे निधन होऊन काहीच दिवस झाले आहेत. निवडणुक आयोगाने अद्याप पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक देखील जाहीर केलेली नाही. काही दिवसांपूर्वी भाजपचे जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण आता राष्ट्रवादीकडूनच असे बॅनर लावण्यात आलेले आहे.

सरकारला महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, म्हणूनच ते राज्याबाहेर फिरतायेत; जयंत पाटलांची टीका

पण यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच वाद होण्याची शक्यता आहे. याचे कारण पुणे लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेसकडे आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते व माजी मंत्र  विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लढवणार असे म्हटले होते. त्यामुळे यावरुन आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

दरम्यान, भाजपकडून या जागेसाठी दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.

Exit mobile version