Download App

Pune Crime : पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार

  • Written By: Last Updated:

पुणे: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale MNS) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगर येथील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडांनी गोळ्या झाडल्या. थिगळे यांचे कुटुंबीय ही घटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय”. तुलाही माज आलाय तुला संपवतोच, म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. यानंतर या गुंडांनी हवेत फायरिंग केली. खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणीची मागणी करत हा गोळीबार केला आहे.

यावेळी या गुंडांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर या गुंडांना हवेत गोळीबार करून थिगळे यांना धमकावून घटनास्थळावरून पळ काढला आहे. थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे थिगळे कुटुंबीय हादरून गेले आहे. या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून राजगुरू नगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

Tags

follow us