Download App

पुण्यात काँग्रेसकडून लढण्यासाठी 91 इच्छुक; यशोमती ठाकूर यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी

पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या आहेत.

Yashomati Thakur News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात काँग्रेस (Congress) इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये पुण्यात काँग्रेसकडून लढण्यासाठी 91 उमेदवार इच्छूक आहेत. पुणे शहरातील 8 जागांसाठी 44 तर पिंपरी चिंचवडच्या 3 मतदारसंघासाठी 22 आणि जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 25 अशा एकूण 91 इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्याकडे उमेदवार निवडीची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. यशोमती ठाकूर यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

पुण्यात एकूण 21 मतदारसंघासाठी तब्बल 91 उमेदवारांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलीयं. एवढचं नाही तर या उमेदवारांच्या खुद्द यशोमती ठाकुर यांनी मुलाखती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कोथरुड मतदारसंघातून एकाच उमेदवाराने मुलाखत दिली असून शिवाजीनगर मतदारसंघातून तब्बल 12 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.

मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वी सरकारची मोठी घोषणा; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी

पुण्यातील कॉंग्रेस भवनात या मुलाखती पार पडल्या असून यावेळी उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस भवनात प्रवेश केला. काँग्रेस भवनाच्या पहिल्या मजल्यावर मुलाखती सुरु होत्या, त्यामुळे उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना मुलाखतीच्या ठिकाणी जात आलं नाही. फक्त उमेदवारांनाच पहिल्या मजल्यावर प्रवेश देण्यात आला. इच्छूक उमेदवारांसोबत शेकडो कार्यकर्ते आल्याने काँग्रेस भवनाचा संपूर्ण परिसर अगदी फुलून गेला होता.

यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्यानंतर आता राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेते आणि केंद्रातील नेत्यांकडे कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय असणार आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाबाबत चर्चा सुरु असून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पुण्यात काँग्रेसने 10 जागांवर दावा केला असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये हडपसर, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघांचा समावेश असून पुरंदर, भोर, खेड, शिरुर, दौंड मतदारसंघावरही काँग्रेस दावा करीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले; निवडणूक रणनीतीकार अरोरा यांनी वाहिली श्रद्धांजली

गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र बिहार झालायं – यशोमती ठाकूर

मुलाखतीनंतर ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, राज्यात सध्या कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचे देणे-घेणे राहिलं नाही. जेव्हापासून महायुती सरकार सत्तेत आलंय, तेव्हापासून गुन्हेगारीत महाराष्ट्र बिहार झाला आहे. यासंदर्भातील जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, नाही तर तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकूर यांनी यावेळी केलीयं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले होते. त्यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आजही असल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसने राज्यभरात हातपाय पसरले असून मेरिटच्या मुद्द्यावरच महाविकास आघाडीत जागावाटप केलं जाणार असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच जसजशा निवडणुकीच्या बातम्या समोर येत आहेत, तसंतसं पक्षांच्याही हालचालींना वेग येत आहे.

follow us