Download App

Radhakrishna Vikhe Patil यांना सत्यजित तांबे का भेटले ? थेट सांगूनच टाकलं…

अहमदनगर : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांच काम करणार असल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करत असतात, आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितलं.

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मला भेटले, माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय घेत असतात. यावेळी सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं. भाजपने जरी सत्यजित तांबे यांना पाठींबा दिला नसला आणि स्थानिक पातळीवर निर्णय होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं असलं तरी सत्यजित तांबे आपल्याला भेटले का ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना मंत्री विखे पाटील यांनी हे उत्तर दिलं आहे.

तांबे आणि विखे यांच्यामध्ये याअगोदर अनेकदा राजकीय कुरघोडी झाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकित हा संघर्ष शिगेला गेला होता. काँग्रेसचे नेते व सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही कोणती भूमिका जाहीर केली नाही. अशातच राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देत राजकीय कुरघोडीच केल्याचे दिसून येतंय. तांबेंना केलेली मदत ही भविष्यकाळात वेगळी राजकीय समीकरणे घडवण्यासाठी असेल, असं मत विखे समर्थकांनी बोलून दाखवले आहे.

Tags

follow us