Download App

Rahul Kul : राऊतांचा आरोप हा राजकीय नैराश्येतून, कुल यांचा पलटवार

Rahul Kul On Sanjay Raut :  भाजपचे ( BJP )  दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल ( Rahul Kul ) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर आता राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फक्त राजकीय हेतूने केलेला आरोप आहे, असे ते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर आरोप केल्यानंतर कुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा पूर्णपणे राजकीय हेतूने केलेला आरोप आहे. त्यांच्या राजकीय नैराश्येतून त्यांनी हा आरोप केला आहे. तसेच ज्यांच्याकडे या सर्व प्रकरणाचे पुरावे जातील ती संस्था याची चौकशी करेल. चौकशीतून काय समोर येते ते पाहू, असे कुल म्हणाले आहेत.

आमदार राहुल कुल हे राऊत यांच्या कोंडीत : 500 कोटींचे मनी लॉन्डरिंग

तसेच आमची सहकारी संस्था आहे. त्यामुळे लोकशाहीत असे आरोप होत असतात. आम्हाला चौकशीसाठी 12 महिने 24 तास तयारचं रहावे लागते, असे कुल म्हणाले आहेत. दरम्यान राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी 2019 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून लोकसभा निवडणून लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे गाजर आंदोलन

दरम्यान संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर तब्बल 500 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आहे . 2016 ते 2022 या कालावधीत गळीत हंगाम बंद असतांना खुल्या बाजारात साखरेची विक्री केल्याचं या पत्रात म्हटलंय. भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवत आहे. शेतकरी लुटला गेलाय, हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लॉन्डरिंग व्यवहार आहे. नि:पक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

Tags

follow us