आमदार राहुल कुल हे राऊत यांच्या कोंडीत : 500 कोटींचे मनी लॉन्डरिंग

आमदार राहुल कुल हे राऊत यांच्या कोंडीत :  500 कोटींचे मनी लॉन्डरिंग

मुंबई : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. डझनावर साखरकारखान्यांमध्ये जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. मग तिथे ईडी गप्पा का? असा सवाल करत एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजींकडे पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता संजय राऊतांनी भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर तब्बल 500 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून या घोटाळ्याची माहिती दिली असून कारवाईची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ असं संबोधलं होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेना आमदारांनी राऊतांवर हक्कभंगाची मागणी केली होती. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी राऊतांवरील कारवाईसाठी हक्कभंग समिती स्थापन केली होती. या समितीचे प्रमुख हे राहुल कुल होते. मात्र, आता राऊतांना कुल यांच्यावरच आरोप केले. राऊतांना भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याच आरोप केला. त्यांनी याबाबतचे पत्र फडणवीसांना लिहिलं. 2016 ते 2022 या कालावधीत गळीत हंगाम बंद असतांना खुल्या बाजारात साखरेची विक्री केल्याचं या पत्रात म्हटलंय. त्यांनी लिहिलं की, मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखऱ कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चत आह. तपास यंत्रणांकडून त्यांची चौकशी होत आहे. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींची गैरव्यवहार यापेक्षा गंभीर आहे. आपण, भ्रष्टाचार खनून काढण्याचं ठरवलं आहे. मात्र, आपल्या राज्यात या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष झाल्यास भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळेल, असा संदेश जाईल, असं राऊत म्हणाले.

राऊतांनी करत सांगितले की, भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवत आहे. शेतकरी लुटला गेलाय, हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लॉन्डरिंग व्यवहार आहे. नि:पक्ष चौकशीची आपल्याकडन अपेक्षा आहे.

मुंबई ठरले देशातील सर्वाधिक ‘हॉटेस्ट’ शहर

संचालक मंडळाबद्दल माहिती देतांना राऊतांनी ट्विट केलंय की, आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखा्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे. PMLA कायद्याने कारवाई व्हावी, असे घोटोळे संचालक मंडळाने केले आहेत. व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली. त्यामुळे राहुल कुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फडणवीस यावर काय कारवाई करतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube