Download App

‘दबावाखाली निर्णय घेणार नाही’; ‘वेळकाढूपणा’ म्हणणाऱ्यांना नार्वेकरांनी सुनावलं

Rahul Narvekar : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवल्यानंतर आता अपात्रतेवर विधी मंडळात सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान सुनावणीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) टीकेचे धनी बनवले आहे. त्यावर बोलताना मी दबावाखाली निर्णय घेणार नसल्याचं राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) विरोधकांना सुनावलं आहे. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकरांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मालगाडी घसरली; कोकणरेल्वे रखडल्या; स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

राहुल नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले, अपात्र आमदारांच्या सुनावणीवरुन विरोधकांकडून वेळकाढूपणाचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र, मी कोणाच्याही दबावाखाली येऊन अपात्रतेचा निर्णय घेणार नाही, जे काही नियमांत असेल तेच मी करणार आहे, ज्या लोकांना संविधानाची माहिती नाही अशा लोकांचा जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकावर आक्षेप असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखं ही वाघनखं वाटत असतील; संजय मंडलिकांचा टोला

तसेच नार्वेकर मतदारासंघात गेले असता पाहणीदरम्यान मतदारसंघाच्या विकासकामांसदर्भआत नागरिकांना , कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेण्यास सांगितलंत त्यानंतर नार्वेकर भडकल्याचे दिसून आले आहेत. इकडे कोणाहीची मक्तेदारी चालणार नाही, एक दोन लोकांना घेऊन चालणारा माणून मी नसल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावल्याचं दिसून आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं केवळ 3 वर्षासाठी भारतात, वाघनखं ‘या’ दिवशी येणार

अनिल परबांचा आरोप :
अध्यक्षांचे वेळापत्रक म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर आता तारखा पडत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे. पुरावे पाहण्याची गरज नाही. वेगळी सुनावणी घेण्याचीही गरज नाही. 23 नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा कळवल्या आहेत. त्यानंतर उलट तपासणी सुरू होणार आहे. परंतु, उलट तपासणी किती दिवस सुरू राहणार काही माहिती नाही. एक महिन्याच्या काळात हे प्रकरण संपायला हवं. पण, आमदार अपात्र होतील या भीतीनेच वेळकाढूपणा केला जात आहे असा आरोप परब यांनी केला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यांत अंतिम सुनावणी होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्या अशी मागणी शिंदे गटाने केली होती. या गोष्टींचा विचार करून वेळापत्रक तयार करण्यात आले.

Tags

follow us