Download App

विधानसभेच्या आधीच कर्डिले आणि तनपुरे यांच्यात खडाखडी

  • Written By: Last Updated:

Rahuri Apmc Election : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे, स्थानिक एक गट असे तिघे एकत्र आलेले आहेत. तर माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा एक गट अशी लढत होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्डिले यांनी तनपुरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ढाकणेंचा आपल्याच संचालकांना धक्का; एकालाही उमेदवारीही नाही
नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंविरोधात तनपुरे हे प्रचार करत आहेत. तर कर्डिले हे विखेंच्या मदतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती कशा पद्धतीने ताब्यात घेता येईल, यासाठी राजकीय डावपेच टाकत आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित विकास मंडळ व महाविकास आघाडी प्रणित जनसेवा मंडळाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

Market Committee Election Kada : कडा बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, निवडणूक बिनविरोध

18 जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण गटः सात जागा
-महाविकास आघाडी -जनसेवा मंडळ अरुण तनपुरे ,महेश पानसरे, बाळासाहेब खुळे, दत्तात्रय कवाने, नारायण सोनवणे ,विश्वास पवार, रखमाजी जाधव.
भाजप प्रणित विकास मंडळ ःउदयसिंह पाटील, सत्यजित कदम, शामराव निमसे, संदीप आढाव ,महेंद्र तांबे ,भगीरथ पवार ,किरण कोळसे, विविध सोसायटी महिला राखीवः दोन जागा-महाविकास आघाडी ःशोभा डुकरे, सुनीता खेवरे .
भाजप प्रणित विकास मंडळ आघाडीः उज्वला साबळे, उषा मांगुर्डे.
विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग जागा एकः
दत्तात्रय शेळके महाविकास आघाडी तर्फे रिंगणात असून भाजप प्रणित विकास मंडळाचे दत्तात्रय खुळे निवडणूक रिंगणात आहेत.

Tags

follow us