Raj Thackeray : ‘त्या’ 44 टोलनाक्यांचं काय होणार? राज ठाकरेंनी दिली बैठकीतील खडा न् खडा माहिती

Raj Thackeray : राज्यात वादग्रस्त ठरत चाललेल्या टोलनाक्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, सरकारने कोणती आश्वासने दिली, याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यासाठी यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक […]

Raj Thackeray

Raj Thackeray

Raj Thackeray : राज्यात वादग्रस्त ठरत चाललेल्या टोलनाक्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, सरकारने कोणती आश्वासने दिली, याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यासाठी यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. या काळात या मुद्द्यावर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता हे टोलनाके बंद होतील अशी अपेक्षा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. या टोलनाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 टोलनाक्यांचा समावेश आहे.

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष

काल सह्याद्रीवर बैठक झाली. तिथे काही गोष्टी ठरल्या. टोलच्या मुद्द्यासाठी मी नऊ वर्षांनंतर सह्याद्रीला गेलो होतो. नऊ वर्षांआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी सुद्धा काही गोष्टी ठरल्या होत्या. काही सुरू झाल्या. त्यावेळीच मला एक गोष्ट समजली होती की टोलचे करार 2026 ला संपणार आहेत. ही काही नवीन गोष्ट नव्हती. पण, काही सुधारणा होणं गरजेचं होतं. करार झाले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते करार बँकेबरोबर झाले होते त्यामुळे त्यात काही करता येत नव्हते. त्यावेळी काही सुधारणा होणे गरजेचे होते पण, दुर्दैवाने तसं घडलं नाही.

राज ठाकरेंना सरकारकडून कोणती आश्वासने ?

Exit mobile version