Raj Thackeray On Maratha Reservation Agitation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत (Raj Thackeray) उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक काल शुक्रवारी 29 ऑगस्टला मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आंदोलकांच्या या ठिय्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने दिलेल्या निर्णयाचा ट्रम्प टॅरिफवर काय परिणाम होईल?
राज ठाकरे (Raj Thackeray) आज ठाण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांनी जेव्हा राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. राज ठाकरे यांना ‘मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय’? असा सवाल विचारण्यात आला. यावर ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकच व्यक्ती देऊ शकते ते म्हणजे एकनाथ शिंदे’,असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सांगितले आहे.
सोनू सूद करणार स्टार प्लसच्या ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च! शोची खासियत
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
माध्यमांच्या मराठा आंदोलनाबाबतच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय ते”, असं ते यावेळी म्हणाले. पुढे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील”, असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडलं आहे.
सोनू सूद करणार स्टार प्लसच्या ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च! शोची खासियत
एकनाथ शिंदे आज दरे गावच्या दौऱ्यावर
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा आटपून आज शनिवारी सातारा येथील आपल्या दरे गावी जाणार आहेत. संपूर्ण राज्यातून मराठा बांधव मुंबईत येत असून मराठा आंदोलन अधिकाधिक तीव्र होताना दिसते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले नाही, त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गणपती दर्शनासाठी दरे गावात जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आले आहे.