Download App

Raj Thackeray : मनसेमध्ये ठाकरेंचं ‘राज’! पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड

Raj Thackeray : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचं माहिती बाळा

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचं माहिती बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली आहे.

आज मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे आता सन 2023 ते 2028 या दरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक समितीने केली आहे.

याबाबत माहिती देताना बाळा नांदगावकर म्हणाले, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक झाली असून या पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची नेमणूक करावी असा ठराव मी मांडला होता याला नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने राज ठाकरेंची नेमणूक झाली आणि त्यानंतर त्यांचा अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच राज ठाकरे यांची निवड भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार झाली असून राज ठाकरे 2028 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! पुणे शहरात भीषण अपघात, एसटी बसने दोघांना चिरडले

राज ठाकरे बैठकीत काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेला मतदान मोदी विरोधात झाला आहे महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मराठी माणसाने अपेक्षाप्रमाणे मतदान केलेलं नाही असं राज ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले आहे. याच बरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवणार असेही ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमचं कोणासोबत बोलणं सुरु नाही. यापूर्वी आम्ही सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत पुढे काय होणार हे माहिती नाही मात्र आपण आपली तयारी करणार तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका असं मी अमित शहांना सांगितलं असं देखील राज ठाकरे म्हणाले.

बारामतीत काका-पुतण्यात फाईट? युगेंद्र पवार म्हणाले, त्यांची इच्छा…

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील विजयी झाले होते. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us