Raj Thackeray News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचा आता महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. अशातच आता राज ठाकरेंचा (Raj Thackeray News) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही मागे राहिलेला नाही. राज ठाकरेंनी आज नाशिक दौरा करत मतदारसंघाची पाहणी केलीयं. यावेळी महाविकास आघाडीसोबत जाणार का? विचारताच राज ठाकरे कडाडल्याचं दिसून आले आहेत. आताचे लवंडे कुठे जातील त्याचा पत्ता नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
मोठी बातमी: ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा
अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत वंचित आघाडीला घेण्याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज वंचित महाविकास आघाडीत सामिल झाल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत आले तर घेणार का? असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता. त्यावर आम्ही आंबेडकरांना निमंत्रण दिलं नव्हते तरी ते आले असल्याचं म्हणाले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. महाविकास आघडीकडे कोण जाणार? तिथं काय आहे? यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले? अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
सत्ताधाऱ्यांची गटबाजी दिसत नाही विरोधकांची दिसते…
सर्वच पक्षांमध्ये गटबाजी असते. सत्ताधाऱ्यांची दिसत नाही आणि विरोधकांची दिसून येत असते. आत्ता लोकसभा निवडणुका आहोत, पण विधानसभा, महापालिका निवडणुका येऊ द्या मग तुम्हाला सत्ताधाऱ्यांची अंतर्गत गटबाजी दिसेल. आमचा उघडा कारभार आहे त्यामुळे आमची गटबाजी दिसते असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसते ठराविका लोकांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आणि अपयश पदरात पाडून घ्यायंच हे मान्य नाही मला त्यामुळे मी निवडणूक लढवत नाही. मी थोडासा विचार करणार असून सध्या मतदारसंघात चाचपणी करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
माझा टोलला नाहीतर टोलवसुलीला विरोध…
माझा टोलला विरोध नाहीतर टोलवसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला विरोध आहे. किती टोल वसूल होतो? किती पैसे तुमच्या खिशात? किती पैसे सरकारला भरले? यामध्ये पारदर्शकता नाही. हीच गोष्ट मी अनेकदा सांगितली आहे विषय टोल नाही टोलवसुली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे भरुन झाले की नाही? सुरु होऊन किती वर्ष झाले एवढ्या काळात पैसे वसुल झाले नाहीत का? याची उत्तरं मिळणार की नाहीत. यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. त्यांच्यासमोर आकडेवारी मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.