मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Tackeray) आज गुढीपाडवा मेळाव्यात (Gudhi padwa Melava)उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी भाजप (BJP), राष्ट्रवादीसह(NCP), शिंदे गटावरही(Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी आपल्याल शिवसेनाप्रमुखपद का नको होतं. याबद्दलही सांगितलं आहे. त्याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्याबद्दल अशा गोष्टी पसरवल्या गेल्या की, राज ठाकरेला संपूर्ण पक्ष हातात पाहिजे होता, ते होऊ न शकल्यानं राज ठाकरे बाहेर पडले, असं पसरवलं गेलं पण ते खोटं आहे. असं माझ्या मनाला कधी शिवलं नाही अन् माझ्या स्वप्नातही ते कधी आलं नाही, कारण तो फक्त धनुष्य नव्हता ते शिवधनुष्य होते. आणि मला माहित होतं की, ते बाळासाहेब (Balasaheb Thackeray)सोडून ते कोणाला झेपणार नाही, असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !
राज ठाकरे म्हणाले की, एकाला ते शिवधनुष्य झेपलं नाही. आणि दुसऱ्याला माहित नाही झेपेल की नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरना शिवसेना सांभाळता येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली आहे. त्याचवेळी राज म्हणाले की, मला काही घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. पण मला काही चिखल नाही करायचा पण एखाद दोन गोष्टी सांगायच्यात.
राज म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या बाजूच्या लोकांनी म्हणजेच खासदार संजय राऊतांनी माझ्या आजच्या भाषणावरुन उद्या तोंड उचकटू नका, काही बोलू नका, नाहीतर त्याच्यानंतर माझ्या तोंडातून काय बाहेर पडेल, ते झेपायचं नाही तुम्हाला अशा प्रकारे राज ठाकरेंनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.