नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !

नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..;  राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !

Raj Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही शिवसेना (Shivsena) पक्ष सोडायचा नव्हता. मी सुद्धा त्यांना फोन करून म्हणालो की तुम्ही शिवसेना सोडू नका. त्यानंतर मी स्वतः बाळासाहेबांशी बोललो. त्यांना विनंती केली. ते सुद्धा तयार झाले. त्यानंतर मला म्हणाले त्याला लगेच घेऊन ये. मग मी नारायण राणे यांना फोन केला. त्यांना सांगितले की आता आपल्याला बाळासाहेबांकडे जायचे आहे. त्यानंतर काही वेळाने फोन आला की त्यांना आणू नकोस. त्यावेळी त्यांच्यामागे कुणीतरी बोलत असल्याचा आवाज येत होता. मग, मला नारायण राणेंना तसे सांगावे लागले की येऊ नका, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नारायण राणेंबाबत घडलेला तो प्रसंग कथन केला.

वाचा : भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट ! राणेंनी दिली होती ऑफर पण, मी…

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी नारायण राणेच काय मलाही मनापासून शिवसेना सोडण्याची इच्छा नव्हती असे सांगितले. पण, जी चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालण्याचे काम करत होती त्यांच्यात वाटेकरी व्हायचे नाही म्हणून पक्ष सोडल्याचे राज यांनी सांगितले.

पहाटेच्या शपथविधीपासून एक फूल दो कॉंटेची थेरं; राज ठाकरेंचा घणाघात

ते पुढे म्हणाले, की राज्यातील राजकारण पाहून मनाला वेदना होत होत्या. त्या वेळेस शिवसेना व धनुष्यबाण हे तुझे का माझे हे ज्यावेळी चालू होते त्यावेळी वेदना होत होत्या. लहानपणापासून तो पक्ष पाहत आलो. तो पक्ष मी जगलो. मला आठवते की दुसरीत असताना माझ्या खिशावर वाघ असायचा. राजकारण लहानपणासून पाहात आणि अनुभवत आलो बाळासाहेबांबरोबर. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली शिवसेना होती.

पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या पहिल्या भाषणात म्हणालो होतो, की माझा वाद हा  बडव्यांशी आहे. ही जी चार टाळकी आहेत ना ती हा पक्षात खड्ड्यात घालणार आणि त्यात वाटेकरी होण्याची माझी इच्छा नाही असे म्हणत मी बाहेर पडलो.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube