संघाची स्तुती करायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी टोचले विश्वास नांगरे पाटीलांचे कान

एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून नांगरे पाटील यांचे कां टोचले आहेत.

Untitled Design 58

Untitled Design 58

Raj Thackeray targets Vishwas Nangare Patil : मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून नांगरे पाटील यांचे कां टोचले आहेत. सरकारी शेवट असलेल्या अधिकाऱ्याने राजकीय किंवा वैचारिक भूमिका जाहीरपणे मांडणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनीं अलीकडेच एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संस्थापकांबद्दल गौरवोद्गार काढले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रदीर्घ सोशल मीडिया पोस्ट करत नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणाले, पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा केवळ संविधान, कायदा आणि पोलीस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे. पण विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा जाहीरपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू संमेलने अराजकीय असल्याचा दावा केला जात असला, तरी ती प्रत्यक्षात राजकीय स्वरूपाची असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकाऱ्याने सहभागी होऊन एखाद्या विचारसरणीची स्तुती जोराने निष्पक्षतेच्या तत्वाला धरून नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, मुदतबाह्य खाद्यपदार्थ प्रकरणी ॲमेझॉन इंडियाच्या गोदामाचा परवाना निलंबित

यापुढे त्यांनी, संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा. जाहीरपणे व्यक्त करायची असेल तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि मग संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, असा टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला देखील लक्ष्य करत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची यावर भूमिका काय, असा सवाल उपस्थित केला आहे. अशा प्रकारची दुहेरी निष्ठा सरकारला चालते का? उद्या दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमात एखादा अधिकारी गेला, तर सरकार त्याच निकषावर कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

महसूल खात्यातील ‘स्टॅम्प ड्युटी स्कॅम’चा पर्दाफाश, 20 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या संशयाने खळबळ

2012 मध्ये रजा अकादमीविरोधातील मनसेच्या मोर्चादरम्यान एका पोलीस कॉन्स्टेबलने मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केल्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची आठवण करून देत, त्याच निकषाचा वापर विश्वास नांगरे पाटील यांच्या बाबतीत होणार का, अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. पोस्टच्या शेवटी मात्र राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांना थाट आवाहन करत, तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी आहात. कोणत्याही राजकीय पक्षापुढे किंवा संघासाठी तुमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेऊ नका, असा सल्ला देखील दिला आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणानंतर आता राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्पक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणावर राज्य सरकार किंवा विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version