Download App

सुरेश जैन CM होणार, हे ऐकताच बाळासाहेब ठाकरेंनी झोपेतही आपला बाणा दाखवला…

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नसल्याचं माझ्यासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना ठणकावून सांगितलं असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी 1995 साली घडलेला किस्सा सांगितला आहे.

राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, 1995 साली शिवसेना आणि भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरु होती. त्यावेळीही आमदारांची खेचाखेची सुरु होती. काही कारणास्तव शिवसेना भाजप युती मुख्यमंत्री पदावर अडकत होती. त्यावर सह्या होत नव्हत्या म्हणून युती होत नव्हती. राज ठाकरे मातोश्रीवर असताना मातोश्रीवर भाजपचे नेते प्रकाश जावडेकरांसोबत इतर नेतेही आले.

त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भेटण्याबाबत सांगितलं. मात्र बाळासाहेब झोपले असल्याचं मी त्यांना सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी बाळासाहेबांना एक निरोप द्या, असं जावडेकरांनी मला सांगितलं. त्यांनतर मी बाळासाहेबांना त्यांचा निरोप पोहोचवला.

मुख्यमंत्री पदावरुन भाजप-सेनेत खडाजंगी सुरु असतानाच त्यांनी भाजपचे सुरेश जैन मुख्यमंत्री होतील, असा निरोप माझ्याकडं सांगितला होता. मी बाळासाहेबांनी हे झोपेतून उठवून सांगितलं. तर बाळासाहेबांनी मुख्यमंत्री होईल तर मराठी माणूसच मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांना सांगण्यास मला सांगितलं आणि पुन्हा बाळासाहेब झोपले होते, असा किस्सा 1995 साली घडलेल्या किस्स्याबद्दल राज ठाकरे यांनी आजच्या कार्यक्रमात सांगितला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांचे असेच एक तैलचित्र विधान परिषदेमध्येही लावण्यात यावं, अशीही मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे. तसेच माझा जन्म हिंदुत्ववादी कुटुंबात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच यावेळी बाळासाहेबांच्या फोटोवर तीन वर्षांनतर हिंदुह्रदय सम्राट हे नाव लागल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, इथे उपस्थित असलेल्या आणि उपस्थित नसलेल्या अनेकांनी… असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबादास दानवे यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे खासदार, आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us