Eknath Shinde On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आता महायुतीच्याच (Mahayuti) दोन बड्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मांडीला मांडी लावून कसं काय बसलात, असा सवाल करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं.
Karthik Aaryan: चंदू चॅम्पियनच्या ट्रेलर लॉन्चसाठी अभिनेता पोहचला ग्वाल्हेरला, फोटो व्हायरल
एका वृत्त वाहीनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आणि भुजबळांना राज ठाकरेंना दिलेल्या प्रत्युत्तराविषयी विचारले असता ते म्हणाले की, बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर मातोश्रीवर बाळासाहेब आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. हा सगळा आता इतिहास आहे. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, त्यांनी भुजबळांना माफ केलं होतं, असं म्हणत शिंदेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
राज ठाकरे काय म्हणाले होते?
श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे झालेल्या सभेत बोलतांना राज ठाकरेंनी पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरूवात केली असेल तर शरद पवारांनी केली. त्यांनी आधी कॉंग्रेस फोडली आणि मग पुलोद स्थापन केलं. 1991 मध्ये पुन्हा छगन भुजबळांचा फितवून पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली होती. बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे काय बसला होता? अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
भुजबळांचे प्रत्युत्तर…
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, असं तुम्ही म्हणता. मग तुम्ही शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवर लोक जेवत नव्हते. असं असतांना तुम्ही का बाळासाहेबांना सोडलं? तुम्ही तर इकडेपण असता, तिकडे पण असता. मी जसं उद्धव ठाकरेंसोबत बसलो होतो, तसं आता एकनाथ शिंदेंबरोबरही बसलो आहे, अशा शब्दात भुजबळांना आपली भूमिका मांडली होती.