Download App

‘मला गुंड बोलण्याचा अधिकार Sanjay Raut यांना कोणी दिला ?; राजा ठाकूर यांचा सवाल

  • Written By: Last Updated:

ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिल्याचा धक्कादायक दावा संजय राऊतांनी केलाय.

राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र दिले. या पत्रावर फडणवीसांनी राऊतांची खिल्ली उडवली. राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे दावे करत असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे राऊतांनी ज्या गुंडाचा उल्लेख केलाय त्याने आपण राऊतांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.

राजा ठाकूर म्हणाले, संजय राऊत नाहक बदनामी करत आहेत, त्यांना मला गुंड बोलायचा अधिकार कोणी दिला, मला कोर्टाने केसेस मधून निर्दोष मुक्त केलय, ते आरोप खोटे असल्याचं ठाकूर म्हणत आहेत. याशिवाय आपण संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं राजा ठाकूरने यावेळी सांगितलं आहे.

कोण आहे गुंड राजा ठाकूर ?

राजा ठाकूर हा ठाणे, कळवा आणि मुंब्रा भाग्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर ठाणे, नवी मुंबईत हत्या, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजा ठाकूर हा 2011 च्या दीपक पाटील हत्या प्रकरणाती आरोपी आहे. ठाकूरकडून पाटील हत्या प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. दीपक पाटील हत्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा देखील झालेली. पण हायकोर्टात अपील केल्यानंतर 2019मध्ये तुरुंगातून बाहेर आला.

Tags

follow us