रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या मागोमाग आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढ होग्त असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे.
२० मार्च रोजी चौकशीकरिता बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, मागील २ महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबीकडून करण्यात आली. तसेच, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गेल्या २ महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत.
आतापर्यंत ३ वेळा राजन साळवी अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाची यासंदर्भात चौकशी करण्यात आली. मला नोटीस पाठवल्यावर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज का ? असा सवाल राजन साळवींनी उपस्थित केला.
राजन साळवी म्हणाले की, “आजच सकाळी माझी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी यांना एसीबीची नोटीस आली. 20 मार्चला त्यांना अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. मी याअगोदर खूपवेळा सांगितलं आहे की, सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालो आहे. राजन साळवी काय आहे, हे माझ्य मतदारसंघात सर्वांना माहिती आहे. नोटीस आल्यावर मी जाहीर केलं होतं की, मी याप्रकरणामध्ये संपूर्ण सहकार्य करणार आहे आणि तसं करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा
काय म्हणाले नेमकं साळवी
उद्धव ठाकरेंबरोबर जे आमदार आहेत. त्यांना या नोटीसा पाठवल्या जात आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांची नावं संग्रही आहेत. पण त्यांना कोणत्याही नोटीसा दिल्या जात नाहीत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त आम्ही दोषी. याचा आम्ही निषेध करत आहोत, असं राजन साळवी म्हणाले. तसेच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप देखील राजन साळवी यांनी केला. कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे साळवींनी यावेळी म्हटल आहे.