Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

मुंबई : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या हजरजबाबी स्वभावासाठी परिचित आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर किंवा आपल्या विरोधकांवर टीका करतांना ते त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करतांना दिसत असतात. मात्र, आता ठाकरे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. बजेटवर नेमकं काय बोलायचं? हा प्रश्न अजित पवारांसमोर होता, असं शहाजी बापू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना सांगितलं आहे.

सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 9 मार्चला राज्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, शिक्षक या समाजतील सर्व घटकांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पाला गाजर हलवा असं म्हटलं होतं. दरम्यान, अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा तिथं उद्धव ठाकरे आले होते. मग अजित पवार बाजूला झाले आणि ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवारांनी कुणाला तरी डोळा मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

IPL 2023 : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

दरम्यान, यावरून आता यावर ठाकरे गटाचे शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होताय उद्धव ठाकरे आल्यानं त्यांनी आपली सुटका करुन घेतली. राज्याचं अंदाजपत्रकचं एवढं सुदर आणि चांगलं झाल. त्यात समाजातील सगळ्या घटकांना सामावून घेण्यात आलं. शेतकरी, कष्टकरी, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या उत्तम आणि सर्वसमावेश अंदाजपत्रकाविरोधात काय बोलायचं, हा प्रश्न अजित पवारांसमोर होता. या धर्मसंकटात त्यांना धाऊन आले उद्धव ठाकरे. आणि अजित पवारांनी आपली सुटका करून घेतली, अशी टीका शहाजी बापू यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube