Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

  • Written By: Published:
Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

Delhi Capitals New Captain : दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे (david warner) दिल्ली कॅपिटल्स संघाची धूरा देण्यात आली आहे. यापूर्वी डेव्हिडने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे. डेव्डिडसोबतच अक्षर पटेलच्या खांद्यावरदेखील संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेलकडे दिल्ली संघाचे  उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली होती. कार अपघातात अडकल्यामुळे दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rushbh Pant) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. पंत पुढील मोसमात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.  वॉर्नरपूर्वी दिल्ली संघाचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे होते. मात्र, काही दिवासांपूर्वी भीषण रस्ते अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत यशस्वी सर्जरी करण्यात आली आहे. सध्या पंतला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला असून, पुढील हंगामातील आयपीएलमध्ये पंत खेळू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

दिल्लीचा पहिला सामना लखनौशी होणार

आयपीएलच्या (IPL 2023 ) आगामी मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी लखनौ येथे लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका संपली असून,  भारतीय संघाने ही मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. दिल्लीची धुरा दिलेल्या वॉर्नरला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातच खेळता आले. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरवता आले नाही. पहिल्या दोन कसोटीत सामन्यात वॉर्नरने तीन डावात केवळ 26 धावा केल्या. त्यामुळे वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे.

असा असेल दिल्ली कॅपिटल्सचा संघ
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोव्हमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, एनरिच नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube