Ram Shinde: राधाकृष्ण विखेंबाबत शिंदेंचे मोठे विधान, ते आत्ताच भाजपमध्ये…

पुणे: राज्यात सध्या भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) हे देखील आगामी काळात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, असे वक्तव्य प्रकाश आंबडेकरांनी केले आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, विखे पाटील हे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत. अजून तीन वर्ष होणे बाकी आहे. असे म्हणतच एकप्रकारे […]

Ram Shinde VS Vikhe : उत्तरेत तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांवर पडला भारी; राम शिंदेंचा पालकमंत्री विखेंना धक्का?

Ramshinde Vikhe

पुणे: राज्यात सध्या भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) हे देखील आगामी काळात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, असे वक्तव्य प्रकाश आंबडेकरांनी केले आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, विखे पाटील हे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत. अजून तीन वर्ष होणे बाकी आहे. असे म्हणतच एकप्रकारे राम शिंदे यांनी विखे पाटील यांना मुख्यमंत्रिपदासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे, असे स्पष्ट केले.

पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर काही ठिकाणी झळकवण्यात आले होते. तसेच जयंत पाटील यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर चिटकवण्यात आले होते. एकंदरीतच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी आस कार्यकर्त्यांना लागली आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी एक विधान केले होते.

Maharashtra Politics : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांच्या जावयाला अटक

राज्याचे महसूलमंत्री तसेच अहमनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, असे आंबडेकर म्हणाले होते. यावर भाष्य करताना आमदार राम शिंदे म्हणाले, विखे पाटील हे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत. अजून तीन वर्ष होणं बाकी आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे महसूलमंत्री आहेत. अजून भारतीय जनता पार्टीशी (BJP)समरस व्हावं, अनुरुप व्हावं आणि त्यानंतर कोणीही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहू शकतं.

मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांवर केली टीका…

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर बाजी नुकतीच समोर आली होती. यावर भाष्य करताना भाजप आमदार राम शिंदे म्हणाले, अजित पवारांना जनार्धन ड्रायव्हरने शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या ड्रायव्हरला वाटते की आपला मालक मोठा व्हावा. मात्र जोपर्यंत मोठ्या मालकाला वाटतं नाही आपला माणूस मोठा व्हावा तोपर्यंत असं होत नाही असे म्हणतच त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे.

Exit mobile version