Download App

‘मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब …’, आठवलेंनी दिला सरकारला घरचा आहेर

Ramdas Athawale On Nitin Gadkari : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुंबई गोवा

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale On Nitin Gadkari : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री रामदास आठवले (Nitin Gadkari) यांनी देशातील अनेक रस्ते केले पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत. त्यामुळे मला या कार्यक्रमात ट्रेनने यावे लागले असेही यावेळी रामदास आठवेल म्हणाले.  खेडमधील नागरी सत्कार कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, या कार्यक्रमाला मी रस्त्याने येणार होते मात्र रास्ता खराब असल्यामुळे ट्रेनने यावे लागले. कोकणातून जाणारा मुंबई गोवा हा महत्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे विकासासाठी हा रास्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. राज्याचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको असेही यावेळी रामदास आठवेल म्हणाले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आजचा मेळावा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला आहे. या पक्षाने देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचं प्रयत्न केला आहे. अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. त्यांनी देशातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले असेही यावेळी रामदास आठवेल म्हणाले.

विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याचं बऱ्या; काळ्या फिती लावून आंदोलन करणाऱ्यांना फडणवीसांनी डिवचलं

तसेच यावेळी बोलताना त्यांनी वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान अशी घोषणा देखील त्यांनी केली. या मेळाव्यात बोलताना त्यांनी खेडमध्ये एकत्र आलेले आहेत, दोन रामदास भाई …मग करु नका तुम्ही जाण्याची घाई..तुमच्या सर्वांची आहे आरपीआय …जशी असते दुधावरची साय.. अशी कविताही त्यांनी म्हटली.

Jay Shah : जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव ? ‘या’ नावांची चर्चा

follow us