Ramdas Athawale On BJP: भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला. तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, भाजप तीस जागांवर लढणार असून उर्वरित जागा शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही (Republican Party of India) आपल्याला दोन जागा मिळाव्या, अशी मागणी सातत्याने केली. मात्र, याबाबत भाजपने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) भाजपविषयी नाराज व्यक्त केली.
गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश पण करिश्मा-करिना कपूरही शिंदेच्या भेटीला वर्षावर; चर्चांना उधाण
महायुतीने राज्यात आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अनेकदा केली. आजही त्यांनी दोन जागा मिळाव्या अशी मागणी केली. रामदास आठवले म्हणाले की, भाजपकडून आरपीआयला दोन जागा मिळाल्या पाहिजे. शिर्डी आणि सोलापूर या जागा आम्हाला मिळाव्यात. नवीन आलेल्या पक्षांना जागा दिली जाते. पण जुन्या पक्षांना लक्षात ठेवलं जातं नाही. २०१२ मध्ये युतीची महायुती झाली, ते रिपाई मुंबईत सोबत आल्यानंतर. अजित पवार आणि शिंदे सोबत आल्याने ही महायुती झालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
अजबच! आता पावसाच्या पाण्यावरही टॅक्स; ‘या’ देशात पुढील महिन्यापासून अंमलबजावणी
पुढं बोलतांना आठवले म्हणाले की, मी केंद्रात तंत्री असल्याने आमचा पक्ष देशभरात वाढला आहे. नागालँडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आलेत. मी आणि रिपाईचे शिष्टमंडळं फडणवीस यांना भेटणार आहे. कारण, केंद्रात एक मंत्रीपद आणि राज्यात एक मंत्रीपद मिळणार हे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, ते आश्वासन अजून पूर्ण केलं नसल्याची खंत आठवलेंनी बोलून दाखवली.
आम्हाला 2 महामंडळ मिळावी. 40-50 कार्यर्कत्यांना डीपीडीसीमध्ये सभासदत्व मिळावे यासाठी, आम्ही प्रयत्नशील आहोत. एक विधान परिषद मिळावी. १०-१२ जागा पुढचा विधानसभेत राज्यात मिळाव्या ही मागणी आहे, असं आठवले म्हणाले.
आम्हाला विश्वासात घेतलं जातं नाही. रिपब्लिकन पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळं आमची गरज नसेल तर भाजपसोबत राहायचं की, नाही याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही आठवलेंनी दिली.
मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावरही आठवलेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवार सोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. आता मनसेची आवश्यकता नाही. इथे आम्हालाच काही मिळत नाहीये… तुम्हाला काय मिळणार आहे?, असं आठवले म्हणाले.