Download App

Maharashtra Politics : रामदास कदमाचं उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले ‘तुम्ही माझ्या घरी भांडी घासा…’

रत्नागिरी : खेडमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम, योगेश कदम, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाबरोबरच भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. यावर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर १०० वेळा खेडमध्ये आला आहात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहराच्या पाठीमागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे. मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागणार असल्याचे आव्हान रामदास कदम यांनी केलं आहे .

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यावर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली आहे. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान फटकेबाजी केली. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे. केशवराव भोसलेचा ड्रायव्हर या वक्तव्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

आम्ही हेरलं म्हणून चोरलं, ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागणार असल्याचे आव्हान त्यांनी यावेळी केलं. मी वाघासारखा जगलोय, कोणाचा ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकी वेळेस माझी गाडी, माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कोणाचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा ? काल तुम्ही भाषणाची सुरुवातच अशी केली होती.

रामदास कदम म्हणाले की, माझा मुलाला देखील तुम्ही संपवण्याचा मोठा प्रयत्न केला. योगेश कदम यांना संपवण्याकरिता काय कारस्थान केले आहेत. १९ तारखेला उदय सामंत सांगणार आहेत. मला तर तुम्ही संपवणार होताच. माध्यमासमोर जाण्याची तुम्ही मला बंदी घातली होती. २००९ च्या निवडणुकीमध्ये मला पाडा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा स्फोट देखील रामदास कदम यांनी केला.

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणार, शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

१९ तारखेला एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा
उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यांनतर एकनाथ शिंदे यांचीही खेडमध्ये सभा होणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली. सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि “शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार.” त्यामुळे येत्या काळात कोकणच्या राजकारणातच मोठी उलथापालथ पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Tags

follow us