Download App

फडणवीसांचा शिंदेंना मोठा झटका, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे नवे प्रमुख रामेश्वर नाईक, मंगेश चिवटेंना हटवलं…

मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले.

  • Written By: Last Updated:

Rameshwar Naik : मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पहिला मोठा झटका बसला. शिंदेंचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (Chief Minister Medical Assistance Fund) विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) यांची नियुक्ती करण्यात आली.

ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवरून नाना पटोलेंचा थेट वार; म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंना.. 

मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठी मदत केली. यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा सुधारली होती. मात्र, आता चिवटे यांना पदावरून हटवून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी जारी केले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी होती.

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण; जाळपोळ अन् वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून लाठीचार्ज 

धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची जनसामान्यांचा नेता म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा मोठा वाटा होता. शिंदेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले. चिवटे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी सोमवारी रात्री कुर्ला बस अपघातानंतरही चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या सगळ्यामुळे चिवटे यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि खास मर्जीतील होते.

अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनीमध्यस्थाची भूमिका बजावली होती. एकनाथ शिंदे यांचे निरोप घेऊन चिवटे अनेकदा मनोज जरांगे यांच्याकडे जायचे. जरांगेंनी उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्यात चिवटेंचा सहभाग होता. मात्र, आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे पद काढून घेण्यात आलय. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.

 

follow us